अंजाळे शिवारात दोन गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त; दोघांवर गुन्हा

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंजाळे शिवारातील नदीच्या काठावर अवैधरित्या आणि बेकायदेशीर गावठी दारू तयार करणाऱ्या दोन हातभट्ट्या यावल पोलीसांनी उध्वस्त केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील अंजाळे गावाच्या शिवारात बेकायदेशीर गावठी दारू बनवित असल्याची माहिती यावल पोलीसांना मिळाल्यानंतर आज शुक्रवार १० एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली. यात दोन गावठी दारूच्या हातभट्ट्या पोलीसांनी उध्वस्त केल्यात. कच्चे व पक्के रसायन ७० लिटर दारू नष्ट केले आहे. २२ हजार रूपये किंमतीचे साहित्य मुद्देमाल जप्त केले आहे. राजू भागवत सपकाळे आणि गोपाल भागवत कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content