अभाविपची महानगर कार्यकारीणी जाहीर

जळगाव प्रतिनिधी | अखील भारतीय विद्यार्थी परिषदेची महानगर तसेच तीन नगर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव छात्रनेता संमेलन कार्यक्रमामध्ये जळगाव महानगर व तिन्ही नगर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या निवडीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविप जळगाव विभाग प्रमुख प्रा.डॉ. मनीष जोशी यांनी काम पाहिले.

नूतन कार्यकारिणीत जळगाव महानगराध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. अमरदीप पाटील, उपाध्यक्ष प्रा. गौरव खोडपे, महानगर मंत्री रितेश महाजन, महानगर सहमंत्री प्रज्वल पाटील, पौर्णिमा देशमुख, कवियत्री बहिणाबाई नगर अध्यक्ष प्रा. डॉ. मुझाईद हुसेन, उपाध्यक्ष प्रा. पवित्रा पाटील, नगर मंत्री आकाश पाटील, नगर सहमंत्री श्रद्धा सोनार, नितेश अग्रवाल, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर अध्यक्ष डॉ. प्रा. सिद्धार्थ चौधरी, उपाध्यक्ष प्रा. हितेश ब्रिजवासी, नगर मंत्री मयूर माळी, नगर सहमंत्री भाग्यश्री कोळी, छत्रपती शिवाजी महाराज नगर अध्यक्ष प्रा. डॉ. अखिलेश शर्मा, उपाध्यक्ष प्रा. डॉ. स्नेहलता शिरुडे, नगर मंत्री गौरवी चौधरी, नगर सहमंत्री चैतन्य बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या वेळी अभाविप प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. श्रीकांत चौधरी, डॉ. प्रा. भूषण राजपूत, महानगरमंत्री आदेश पाटील, एस.आर. चौधरी उपस्थित होते. आदेश पाटील यांनी कामांचा आढावा सांगितला. चिराग तायडे यांनी सूत्रसंचालन केले. चैतन्य बोरसे यांनी आभार मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!