जळगाव जिल्हा पूर्णपणे होणार ‘अनलॉक’ : जाणून घ्या काय होणार सुरू ?

जळगाव प्रतिनिधी । राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यात उद्यापासून पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार असून याबाबत जिल्हा प्रशासन लवकरच अधिकृत घोषणा करू शकतो. दरम्यान, अनलॉक झाल्यानंतर नेमके काय सुरू होणार याची माहिती आम्ही आपल्याला देत आहोत.

जळगाव जिल्ह्यात पॉझिटीव्हीटी रेट खूप कमी असल्यामुळे १ जूनपासून मर्यादीत प्रमाणात अनलॉक करण्यात आले होते. मात्र आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केल्यानुसार ४ जूनपासून राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार असून यात जळगावचा समावेश आहे. जळगाव जिल्हा प्रशासन याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अनलॉक झाल्यानंतर जिल्ह्यात संपूर्ण बाजारपेठ उघडणार असून यात खालील घटकांचा समावेश राहणार आहे.

 

पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही

बस 100 टक्के क्षमतेने सुरू होतील

रेस्टॉरंट, मॉल्स सुरू होतील

गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील

खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील

चित्रपट शुटींगला परवानगी

थिएटर सुरू होतील

सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट 

ई कॉमर्स सुरू राहिल

जिम, सलून सुरू राहणार

आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल

    इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील

सुधारित वृत्त (सायंकाळी सात वाजता) : दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जळगावसह राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक होणार असल्याची घोषणा केली असली तरी राज्याच्या माहिती व जनसंपर्क खात्याने मात्र याबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.