जिल्ह्यातील सात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील सात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून याचे आदेश आरोग्य खात्यातर्फे पारीत करण्यात आले आहेत.

आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रातील गट-अ या संवर्गातील २८० वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश काल पारित झाले. यात जळगाव जिल्ह्यातील सात अधिकार्‍यांचा समावेश आहे. सहा बदल्या या जिल्ह्यात तर एकच बदली ही जिल्ह्याबाहेर झाली आहे.

यात येवती (ता. बोदवड) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजय सपकाळ यांची धामणगाव येथे, साकळी (ता. यावल) येथील डॉ. सागर पाटील यांची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात, उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील डॉ. विशाल पाटील यांची जळगाव जिल्हा क्षयरोग केंद्र येथे, मुक्ताईनगर येथील डॉ. नीलेश पाटील यांची मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात, रावेर येथील डॉ. एन. डी. महाजन यांची सार्वजनिक रुग्णालय जळगाव येथे तर वरखेडी (ता. पाचोरा) येथील डॉ. शांताराम ठाकूर यांची जिल्हा क्षयरोग केंद्र जळगाव येथे बदली झाली आहे.

दरम्यान, वरणगाव येथील डॉ. क्षितिजा हेंडवे यांची वावंजे (ता. पनवेल) येथे बदली झाली. बदली झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना बदलीच्या ठिकाणी लवकरात लवकर हजर व्हावे लागणार आहे.

Protected Content