जळगाव, प्रतिनिधी | शहरातील न्यू जागृती मित्र मंडळ संचलित हरी विठ्ठलनगरातील जिजामाता विद्यालयात शनिवारी जादूगार ढवलजी चंदन यांनी विविध जादूचे प्रयोग करून दाखवले. यावेळी धवलजी यांनी विविध जादूचे प्रयोग दाखवून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. त्यामध्ये त्यांनी पत्त्यांच्या विविध जादू, स्मरणशक्ती घालवणे, संमोहित करणे असे प्रकार करून दाखवले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डी.एल. महाले, मध्य प्रदेश पोलीसचे अधिकारी देवेंद्र चौधरी, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगला महाजन , उपशिक्षक संजय खैरनार, लता इखनकर, किशोर पाटील, आशा पाटील, संगीता पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे, शैलाजा चौधरी, संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय खैरनार यांनी केले.