Home क्राईम फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताला न्यायालयीन कोठडी

फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताला न्यायालयीन कोठडी

0
109


जळगाव प्रतिनिधी । रामानंदनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकहून अटक केली होती. संशयितला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सविस्तर असे की, गौतम लहाने याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गु.र.न. १६३/२०१८ भा.द.वि. ४२०, ४६५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यापासून व दाखल झाल्यापासून गौतम लहाने हा फरार होता. संशयित आरोपी गौतम लहाने नाशिक येथे घरी आला असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार नाशिक येथील इंदीरा नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने संशयित आरोपी गौतम लहाने याला काल बुधवारी अटक केली होती. आज गुरूवारी संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


Protected Content

Play sound