दिलासा : जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्येत घट; बरे होणारे वाढले !

जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्या वाढीचा दर गत चोवीस तासांमध्ये लक्षणीयरित्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात ३५७ कोरोना बाधीत आढळून आले असतांना ६७५ रूग्णांनी या रोगावर मात केली आहे. तर मृताची संख्या सुध्दा थोडी कमी होऊन १० इतकी झाली आहे.

तालुका निहाय आजची आकडेवारी

जळगाव शहर-४४, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-४७, अमळनेर-१५, चोपडा-४७, पाचोरा-४, भडगाव-५, धरणगाव-२, यावल-१०, एरंडोल-०, जामनेर-१३, रावेर-२०, पारोळा-९, चाळीसगाव-३९, मुक्ताईनगर-४०, बोदवड-२९ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ३५७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३७ हजार १३६ रूग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख २५ हजार ५३३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. उर्वरित ९ हजार १४३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १० बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

Protected Content