पहूर पत्रकार संघटनेचा स्तुत्य उपक्रम : लोकसहभागातून रुग्णालय साहित्याचे संकलन (व्हिडिओ)

पहूर , ता. जामनेर ।  कोरोना बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात जिल्ह्यात आदर्श निर्माण  केलेल्या पहूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा सुविधा  मिळावी यासाठी पहूरकरांचे मदतीचे हात पुढे सरसावले असून दीड लाख रुपये किमतीचे साहित्य तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले . यावेळी  दात्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला .

पहूर शहर पत्रकार संघटनेच्या पुढाकाराने पहूर ग्रामीण रुग्णालयास लोकप्रतिनिधी , व्यापारी , डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन आणि दातृत्ववान ग्रामस्थांच्या सहकार्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर , निवारा शेड, कुलर्स, पंखे , व्हीलचेयर,  बेडशीट्स, बकेट्स, मेडिसिन इत्यादी ग्रामीण रूग्णालयास  आवश्यक साहित्य प्राप्त झाले. ग्रामीण रुग्णालयात दात्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अरुण शेवाळे होते .तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे , माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा , माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे,   आरोग्यदूत अरविंद देशमुख, आरोग्यदूत प्रफुल्ल लोढा , अॅड. एस .आर. पाटील  आदींनी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोज जोशी यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा,  जि. प. सदस्य अमित देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, सरपंच नीताताई पाटील, माजी सरपंच शंकर जाधव,  लक्ष्मण गोरे, उपसरपंच श्याम सावळे, राजू जाधव,  रविंद्र मोरे,  युसूफ बाबा,  अरुण घोलप, ज्ञानेश्वर करवंदे, कमलाकर पाटील,  सलीम शेख , वासुदेव घोंगडे,  चेतन रोकडे, डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. संदिप कुमावत, डॉ. संदिप पाटील, डॉ. योगेश ढाकरे, डॉ. किर्ती पाटील, डॉ. प्रशांत पांढरे , डॉ. जितेंद्र घोंगडे, गणेश पांढरे, संजय तायडे, अर्जुन बारी , अब्बु तडवी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी केले. आभार शरद बेलपत्रे यांनी मानले . यशस्वीतेसाठी सर्व पत्रकार बांधव, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .

असे  दाते …असे दातृत्व …!

सुप्रीम कंपनी गाडेगाव ,  पोलीस स्टेशन पहूर ,  आणि कै . मैनाबाई रामराव पाटील यांच्या स्मरणार्थ अॅड . एस .आर .  पाटील यांनी निवारा शेड उभारून दिले . कोरोनावर यशस्वी उपचार करून सुखरुप घरी आल्याबद्दल लक्ष्‍मीबाई शामराव राजपूत यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर साठी २२ हजाररुपयांची देणगी दिली .तसेच कृषी पंडित पतसंस्था ,सप्तशृंगी पतसंस्था ,महात्मा फुले पतसंस्था , रायचंद सोभागचंद लोढा पतसंस्था ,ग्रामपंचायत पहूर पेठ ,ग्रामपंचायत पहूर कसबे , मेडिकल असोसिएशन , डॉक्टर्स असोसिएशन , व्यापारी , ग्रामस्थ यांनीही भरीव मदत केली . यावेळी मान्यवरांनी पहूर ग्रामीण रुग्णालयात होत असलेल्या रुग्ण सेवेबद्दल गौरवोद्गार काढले . नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ . किर्ती पाटील यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निता पाटील यांनी सत्कार केला . या स्तुत्य उपक्रमामुळे पहूरकरांनी  एक दातृत्वाचा नवा आदर्श निर्माण केला आहे .

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/524613975393061

 

Protected Content