कासोदा येथे शांतता समिती बैठक संपन्न

kasoda

कासोदा प्रतिनिधी । येथे बालाजी मंदीराच्या सभागृहात पोलीस स्टेशनतर्फे शांतता समितीची बैठक दि. 9 ऑगस्ट रोजी घेण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, या बैठकीत बकरी ईद, गणपती उत्सव, हरिनाम सप्ताह हे सण गुण्यागोविंदाने साजरे करावे यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी आव्हान करण्यात आले आहे. यावेळी चाळीसगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, डी.वाय.एस.पी. उत्तमराव कडलक हे अध्यक्षस्थानी होते. तर येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी स.पो.नि.रविंद्र जाधव, मा.जि.प.उपाध्यक्ष हिंमत पाटील, मुक्तार पंजाबी, मधुकर समदानी, सरीता मंत्री, जितेंद्र तांदळे, आबीद शेख, समद कुरेशी, अजीज बारी, नरेश ठाकरे, रवींद्र चौधरी, जेष्ठ पत्रकार प्रमोद पाटील यांनी विचार व्यक्त केले.

तर यावेळी पि.एस.आय.नरेश ठाकरे, सहा.फौजदार विजय पाटील, सहा.फौजदार सहदेव घुले, सहा.फौजदार दयाराम पाटील, पो.हे.कॉ.नंदू पाटील, पो.ना.शरद राजपूत, पो.कॉ.जितेश पाटील, पो.कॉ.इमरान पठाण, पो.कॉ. समाधान भागवत, पो.कॉ.दिपक आहिरे, व गावातील पत्रकार, परिसरातील पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य व गावातील हिंदू-मुस्लिम धर्मातील आदी लोक उपस्थितीत होते. प्रस्ताविक, सूत्रसंचालन व आभार पी.एस.आय.नरेश ठाकरे यांनी मानले.

Protected Content