संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रेरणा महोत्सव’ साजरा

gadagebaba

 

भुसावळ प्रतिनिधी । येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच प्रेरणा महोत्सव साजरा करण्यात आला असून यामध्ये “जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान व भारतीय युवक” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय स्तरावर नवनवीन आवाहने समोर येत आहेत. नवीन तंत्रज्ञान येत आहे. या सर्व आवाहनांना तुम्हाला सामोरे जायचे आहे. धैर्य, निष्ठा आणि समर्पित भावनेने आपण या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाल, असा विश्वास विनपॉवर इंजिनियर्स अँड असोसिएशन चैन्नईचे टीम मॅनेजर रमेश कुमार हे कार्यक्रमांप्रसंगी बोलत होते. विज्ञान आणि अभियांत्रिकी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जागतिक स्तरावर देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारतीय युवक व अभियंते आघडीवर आहेत. अभ्यासुवृत्ती, कष्ट आणि समर्पणाच्या भावनेने कार्य करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यश प्राप्त होतेच. अभ्यासक्रम पूर्ण करतांना नेहमीच लक्षात ठेवावे की भविष्यातही नवनवीन ज्ञान संपादन करण्याची प्रक्रिया आपल्याला सुरु ठेवावी लागणार आहे. सध्याच्या युगात तंत्रज्ञान बदलत आहे. नवनवीन संकल्पना पुढे येत आहेत. तरुण संशोधकांपुढे अद्ययावत ज्ञान संपादन करण्याचे मोठे आव्हान आहे. गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडे देश मोठ्या आशेने पहात आहे असे ही ते म्हणाले.

याचबरोबर,  हवामान बदलापासून ते कृषी उत्पादन वाढवण्यापर्यंत, स्वच्छ ऊर्जा पुरवण्यापासून ते जलसंधारणापर्यंत, कुपोषणाची समस्या संपविण्यापासून ते कचरा व्यवस्थापनापर्यंत आज आपल्याकडे अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांवर तुमच्याकडे असलेल्या सर्वोकृष्ट संकल्पनांनी परिणामकारी उपाय शोधून काढण्यासाठी तुम्ही पुढे या, या समस्यांवर प्रयोग शाळांमधून विद्यार्थ्यांकडूनच चांगले उपाय शोधले जावू शकणार आहेत. यासाठी महाविद्यालयाच्या बाजूने जे काही शक्य आहे ते सर्व काही करण्याची आमची तयारी आहे. महाविद्यालयात संशोधनाचे वातावरण तयार करण्याचे कामही आता जोमाने सुरू झाले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे आवाहन प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी केले.

यावेळी प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, अकॅडमीक डीन डॉ. राहुल बारजिभे, विभाग प्रमुख प्रा.सुधीर ओझा, डॉ. पंकज भंगाळे, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. श्रीकांत चौधरी, प्रा.किशोर चौधरी, प्रा. अभिजित इंगळे, प्रा.धिरज पाटील, प्रा.चित्तरंजन पाटील, प्रा.राहुल चौधरी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.किशोर चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.अभिजित इंगळे यांनी केले.

Protected Content