विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जळगाव प्रतिनिधी । भावी कलावंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कुलगुरू यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  विद्यापीठातील भावी कलावंत विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यशास्त्र विभाग असणे आवश्यक आहे, परंतु तसे आजपर्यंत जाले नाही. नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्याबाबत कलावंतांनी बऱ्याच वेळा तत्कालीन कुलगुरूंची भेट घेऊन पाठपुरावा केला. अर्ज सुद्धा करण्यात आले त्यावर कुलगुरूंनी निधीचे कारण पुढे करून नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात येऊ शकत नाही, असे सांगून त्याबाबत असमर्थता दाखवली होती, उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात व पूर्ण खानदेशात विद्यार्थी पदवीधर आहे. त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे पण विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएट नाट्य विभाग नसल्याने विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करता येत नाही. पर्यायाने नवीन कलावंत आपल्या विद्यापीठात तयार होत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा हितासाठी विद्यापीठात  येत्या शैक्षणिक वर्षात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महानगर सचिव ॲड. कुणाल पवार, सांस्कृतीक विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव लवंगले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content