मू.जे. महाविद्यालयात सेट-नेट परीक्षा प्रशिक्षण कार्यशाळा

जळगाव, प्रतिनिधी  । नेट-सेट परीक्षांच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्या संदर्भग्रंथांचे वाचन केले पाहिजे, विविध घटकांचा अभ्यास करतांना कोणत्या अभ्यासपद्धती स्वीकारल्या पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे मिळवीत याकरिता नेट-सेट परीक्षा प्रशिक्षण कार्यशाळा अत्यावश्यक आहेत. अशा कार्यशाळांचा उपयोग परीक्षार्थी विद्यार्थ्यांना निश्चितपणे होतो असे मत मू. जे. महाविद्यालयातील सामाजिकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. देवेंद्र इंगळे यांनी व्यक्त केले.

 

मू. जे. महाविद्यालयातील भाषा प्रशाळेच्या वतीने दि. १ ते ९ सप्टेंबरदरम्यान  आयोजित केलेल्या नेट-सेट परीक्षा प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.  महाविद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या विषयांचे दुसऱ्या पेपरसाठीचे मार्गदर्शन दि. १ ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान या कार्यशाळेत करण्यात आले. डॉ. हरेश शेळके, अहमदनगर, डॉ. संदीप माळी, मुक्ताईनगर, डॉ. अतुल देशमुख, भडगाव, डॉ. राहुल पाटील, जव्हार, डॉ. प्रकाश शेवाळे,नाशिक आणि डॉ. विलास धनवे, जळगाव यांनी मराठी विषयाचे मार्गदर्शन केले. डॉ. दुर्गेश बोरसे, अमरावती, डॉ. अतुल सूर्यवंशी, पाचोरा, डॉ. पंडित चव्हाण, जळगाव, प्रा. नितीन पाटील, अमळनेर, डॉ. गजानन पाटील, शिरपूर यांनी इंग्रजी विषयासाठी मार्गदर्शन केले. डॉ. कृष्णा गायकवाड, मुक्ताईनगर, डॉ. मनोज महाजन, डॉ. रोशनी पवार, डॉ. विजय लोहार, जळगाव, डॉ. विजय सोनजे, यांनी हिंदी विषयासाठी तर डॉ. मुग्धा गाडगीळ, पुणे, डॉ. निलेश जोशी, मुंबई, डॉ. रुपाली कवीश्वर, अमरावती, डॉ. संभाजी पाटील, नागपूर व डॉ. स्वानंद पुंड, वणी यांनी संस्कृत विषयासाठी मार्गदर्शन केले. प्रत्येक विषयाच्या दुसऱ्या पेपरकरिता प्रत्येकी ५ साधनव्यक्तींनी मार्गदर्शन केले.

सेट/नेट परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी दि. ६ ते ९ सप्टेंबर २०२१ दरम्यान प्रा. राजीव पवार, डॉ. अतुल सूर्यवंशी, डॉ. लिना भोळे, डॉ. केतन चौधरी व डॉ. चेतन महाजन या ५ साधनव्यक्तींनी मार्गदर्शन केले. यामध्ये शिक्षण अभियोग्यता, संशोधन, गणित आणि बुद्धिमापन, लोकसंख्या विकास आणि पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती विश्लेषण आदी घटकांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. योगेश महाले, डॉ. अनिल क्षीरसागर, प्रा. विजय लोहार आणि डॉ. विलास धनवे यांनी काम पहिले. कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे, भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसूर, मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील, हिंदी विभागप्रमुख डॉ. रोशनी पवार व संस्कृत विभागप्रमुख डॉ. भाग्यश्री भलवतकर यांचे मार्गदर्शन लाभले.    या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील २५२ विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. अनिल क्षीरसागर यांनी केले. महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाने तांत्रिक सहाय्य केले.

 

Protected Content