नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर : जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची व्याप्ती वाढत असल्याने सतर्क झालेल्या राज्य सरकारने नाताळसाठी नियमावली जाहीर केली असून यात हे पर्व साधेपणाने साजरे करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत. आजवर १४ राज्यांत एकूण २२०हून अधिक जणांना ओमायक्रॉनी बाधा झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली यात आघाडीवर आहेत. यामुळे नाताळ सण देखील साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. तसेच नाताळसाठी नियमाली देखील शासनाने जाहीर केली आहे.

राज्य शासनाने नाताळसाठी जाहीर केलेल्या नियमावलीत ख्रिस्ती बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने करावा असे सूचित करण्यात आले आहे. यात चर्चमध्ये येणार्‍या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला असून फटाक्यांच्या आतषबाजीला तसेत गर्दीला आकर्षित करणार्‍या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि मिरवणूकीच्या आयोजनांना मज्जाव करण्यात आला आहे. कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी. तसेच स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या मासमध्ये ५०% लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी जास्त जणांचा समावेश नसावा. मास्कचा वापर, सॅनिटायझेशन आणि फिजीकल डिस्टन्सींग या बाबी बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

Protected Content