पहूर – जामनेर पी. जे .रेल्वे बंद पडू देणार नाही – खलील देशमुख

पहूर ता.जामनेर प्रतिनिधी | ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पाचोरा -जामनेर पी. जे. रेल्वे बंद पडू देणार नाही. त्यासाठी प्रसंगी व्यापक जनआंदोलन छेडले जाईल असे प्रतिपादन पी.जे.रेल्वे बचाव कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख यांनी केले.

ते पहूर येथील कृती समितीच्या बैठकीत बोलत ते होते. ते म्हणाले, “शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी सुरू केलेली पाचोरा जामनेर पी. जे. रेल्वे बंद करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला असून पी .जे. रेल्वेचा गाशा गुंडाळण्याचा विश्वास वृत्तामुळे पाचोरा आणि जामनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गोरगरीब प्रवाशांची जीवनदायिनी समजली जाणारी पाचोरा जामनेर पी. जे. रेल्वे बंद करण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावरून केल्या जात आहेत . डिझेल पंप बंद करणे, कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र बदली करणे यामुळे सदर रेल्वेमार्गाचा गाशा गुंडाळला जात आहे. हे स्पष्ट झाल्याने ऐतिहासिक पाचोरा जामनेर रेल्वे मार्गाचे संवर्धन करून नव्याने सदर मार्ग सुरू व्हावा त्याचबरोबर सदर मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर व्हावे यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जातील.” प्रसंगी व्यापक जनआंदोलन छेडण्याचा ही इशारा पाचोरा जामनेर रेल्वे बचाव कृती समितीने दिला आहे

“पाचोरा जामनेर मार्गाचे खरोखरच ब्रॉडगेज मध्ये रूपांतर होणार असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. मात्र ब्रॉडगेजच्या नावाखाली जर सदर रेल्वे बंद करण्याचा घाट शासन करीत असेल तर मात्र आम्ही स्वस्थ न बसता व्यापक जनआंदोलन छेडू.” असा इशारा खलील देशमुख यांनी याप्रसंगी बोलताना दिला .
पहूर सह जामनेर, शेंदुर्णी,वरखेडी ,आदी ठिकाणीही समितीच्या कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या.

आज गुरुवारी सायंकाळी ईश्वरबाबूजी जैन पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या व्यापक बैठकीत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पहूर येथील माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, रेल्वे सेंट्रल बोर्डचे सदस्य रामेश्वर पाटील, गणेश पांढरे, शैलेश पाटील, अरविंदीं देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून सदर रेल्वे सुरू करणे कामी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .याप्रसंगी पाचोरा जामनेर रेल्वे बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पहूर येथील ईश्वरबाबूजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, उपसरपंच शाम सावळे, राजू पाटील, किरण पाटील, रविंद्र मोरे, शरद पंढरे, यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते .

Protected Content