वाराणसीच्या ‘ज्ञानवापी’ संदर्भात आज खंडपीठात सुनावणी

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | वाराणसीतील ज्ञानवापी-श्रृंगार गौरी परिसराचे गेल्या दोन दिवसात सर्वेक्षण करण्यात आले. या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थापनाच्या याचिकेवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी होणार आहे.

वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण करण्याच्या निर्णयाविरोधात ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणामधील मुस्लीम पक्षकारांनी नुकतेच झालेले मशिदीचे सर्वेक्षण हे धार्मिक स्थळ विशेष तरतूद कायदा १९९१ च्या विरोधात असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात  दाखल केला होता.  या कायद्यानुसार देशातील अन्य धार्मिक स्थळांची १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी होती तशीच स्थिती अयोध्येतील राम जन्मभूमी- बाबरी मशीद वगळता ठेवण्यात यावी, त्यात फेरबदल करण्यात येऊ नये, असे नमूद आहे. परंतु या कायद्याचे उल्लंघन करणारा हा सर्वेक्षणाचा निर्णय असल्याचा दावा मुस्लीम पक्षकरांनी केला आहे.

शिवलिंगाचे संरक्षण क्र्नायची मागणी याचिका
न्यायालय नियुक्त आयोगाकडून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले, त्यात जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले ,  मशिदीत नमाजाआधी हात धुण्याचे स्थळाच्या ठीकाणी ‘वझुखाना’ येथे सर्वेक्षण पथकाला शिवलिंग आढळले. या शिवलिंगाचे संरक्षण व्हावे, अशी मागणीची याचिका यादव यांनी अन्य ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांच्या येथील दिवाणी न्यायालयात दाखल केल्याचे म्हटले आहे .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content