फी साठी मागासवर्गीय विद्यार्थ्याचा छळ; न्याय मिळण्याची मागणी

जळगाव, प्रतिनिधी शिष्यवृत्तीस पात्र  विद्यार्थ्यास संस्थेचे चेअरमन   जबरदस्तीने फी मागत असून याबाबत विद्यार्थ्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस महानगर  सचिव  अॅड. कुणाल पवार यांच्याकडे  तक्रार केली आहे त्याची अडचण सोडवली नाहीतर त्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे त्याने पत्रात स्पष्ट केले आहे.   

पाचोरा तालुक्यातील बांबरूड येथील सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमधील अंतिम वर्षाचा विद्यार्थी कृष्णा आबा मोरे याची शिष्यवृत्ती आलेली असतांना संस्थाचालक पोतदार हे वारंवार फी मागत असल्याची तक्रार समाज कल्याण सहाय्यक आयुक्त  योगेश पाटील यांच्याकडे केली होती  त्यांनी १२ मे २०२१ रोजी  कृष्णा मोरे हा शिष्यवृत्तीस पात्र असून शासन निर्णयानुसार त्याच्याकडून शिक्षण शुल्क घेऊ नये आदेशित केलेले आहे. मात्र, संस्थेचे चेअरमन पोतदार हे  कृष्णा मोरे  याकडे  वारंवार शैक्षणिक शुल्क व इतर शुल्काची मागणी करत  आहेत.   या विद्यार्थ्यावर विनाकारण गुन्हा दाखल करण्यात आल्याची तक्रार या विद्यार्थ्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस महानगर सचिव अॅड. कुणाल पवार यांच्याकडे केली आहे. कोरोना काळात हाताला काम नसल्याने हा विद्यार्थी भाजीपाला विक्री करून शिक्षण घेत आहे. यातच चेअरमन पोतदार यांनी त्याच्यावर विनाकारण गुन्हा दाखल  केल्याने अशा स्वरूपाचा त्रास सुरु राहिल्यास आपण आत्महत्या करू असेही त्याने आपली व्यथा मांडतांना सांगितले आहे.

 

Protected Content