नशिराबाद येथे विवाहितेला मारहाण

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी |  तालुक्यातील नशिराबाद गावातील पाण्याची टाकी परिसरात अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून एका २८ वर्षीय विवाहितेला जमावाने शिवीगाळ व मारहाण करून दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील वैभवी केदार भट (वय-२८) या आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. दरम्यान या भागातील अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता वैभवी भट आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अरुणा सुदाम धोबी यांच्यात वाद झाला. त्यानंतर वैभवी भट यांना अरुणा धोबी यांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.  तसचे त्यांच्या गल्लीतील ज्योती संतोष कोळी, जनाबाई मोतीलाल धोबी, ज्योती युवराज धोबी, सविता सुनील साळी, सुधाकर दामू धोबी, विवेक युवराज धोबी, सुदाम एकनाथ कोळी, आकाश सुदाम धोबी, सागर सुदाम धोबी, युवराज मोतीलाल धोबी सर्व राहणार धोबी गल्ली, नशिराबाद ता.जि. जळगाव यांनी देखील शिवीगाळ व मारहाण केली. यामध्ये वैभवी भट यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता वैभवी भट यांनी दिलेल्या जबाबावरून नशिराबाद पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहे.

 

Protected Content