राजमालती नगरात दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हा, नऊ जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मालती नगर येथे लोखंडी रॉडसह लाठ्या काठ्या लोखंडी आसर्‍यांचा वापर करत दोनगटात  जोरदार हाणामारी झाली. या हाणामारी चार दुचाकींसह दोन चारचाकी वाहनांची तोडफोड करत नुकसान  झाले आहे.  याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या परस्पर विरोधात २८ ते ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात नऊ जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.  

सिद्धार्थ माणिक वानखेडे  वय ३४ रा. राजमालती नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन असे की, वानखेडे हे परिवारातील मुलांसह गल्लीतील काही मुले राज मालती नगराच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये क्रिकेट खेळत होते. यावेळी जानु पटेल नावाचा मुलगा आला व तो विशाल अजय सुरवाडे याच्या कानांत जोरजोराने आरोळ्या मारत होता. विशालने त्यास  आरोळ्या मारू नको असे सांगितले असता जानू पटेल याने वाद घालत त्याच्या वडिलांसह इतर नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले. घटनास्थळी आल्याने लोखंडी रॉड तसेच लाकडी बॅटने वानखडे यांच्यासह विशाल सुरवाडे यांच्या कुटूंबियांना बेदम मारहाण करत जखमी केले. तसेच सुरवाडे वानखेडे यांच्या परिवाराच्या चार दुचाकींसह दोन चारचाकींची तोडफोड करत नुकसान केले. याप्रकरणी राजू बिस्मिल्ला पटेल, संजू बिस्मिल्ला पटेल, मेहमूद बिस्मिल्ला पटेल, आवेश राजू पटेल, जस्मिन राजू पटेल, जानू संजु पटेल, मुन्नी राजु पटेल, परवीन राज पटेल व इतर पाच जण यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तर राजू पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विशाल सुरवाडे याने पटेल यांच्या नात्यातील मुलीची छेड काढली. त्याचा जाब विचारण्यासाठी राजू पटेल गेले असता विशाल सुरवाडे  यांच्यासह त्याच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी पटेल यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना बेसबॉलचा दांडा,  लोखंडी रॉड, लोखंडी सळ्या याने बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी हा विशाल अजय सुरवाडे सिद्धार्थ ऊर्फ बाळा माणिक वानखेडे, अजय पांडुरंग सुरवाडे, विजय पांडुरंग सुरवाडे, दर्शन विजय सुरवाडे प्रेम विजय सुरवाडे, राज सुरवाडे आणि छाया माणिक वानखेडे, सपना सिद्धार्थ सुरवाडे, शांताबाई पांडुरंग सुरवाडे, शारदा विशाल सुरवाडे, सोनी प्रेम सुरवाडे  व व इतर दोनजण सर्व राहणार राज मालती नगर अशा चौदा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचा यांनी दोन्ही गटाच्या नऊ संशयितांना अटक केली आहे रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती.

Protected Content