…तर माझा शिरच्छेद केला जाईल — अदर पुनावाला

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काही मुख्यमंत्री व उद्योगपतींकडून लसींची मागणी व धमकावणारे फोन  येत असल्याचा खुलासा करतानाच आदर पुनावाला यांनी सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचं नाव घेतलं तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती व्यक्त केली.

 

भारतामध्ये  ‘कोव्हिशिल्ड’ बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला यांनी  एका  मुलाखतीमध्ये भारतातील सध्याच्या स्थितीसाठी कोण जबाबदार आहे यासंदर्भात आपण भाष्य करु शकत नाही असं म्हटलं आहे.

 

सध्या भारत ज्या कोरोना संकटामध्ये सापडला आहे त्यासाठी कोणाला दोषी ठरवता येईल अशा अर्थाचा प्रश्न पुनावाला यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “मी तुम्हाला योग्य उत्तर दिलं किंवा उत्तर जरी दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल. मी निवडणूक किंवा कुंभ मेळ्यासंदर्भात भाष्य करु शकत नाही. हा खूप संवेदनशील विषय आहे. मला वाटत नाही की परमेश्वरालाही परिस्थिती एवढी वाईट होईल याचा अंदाज बांधता आला असता,” असं पुनावाला म्हणाले.

 

”देशातील अनेक बड्या व्यक्तींच्या दबाव टाकणाऱ्या फोन कॉल्समुळे त्रास होतोय”, कोविशिल्ड लशीसाठी देशातील काही बड्या व्यक्तींचे फोन येत आहेत. काही मुख्यमंत्री व उद्योगपतींचाही समावेश आहे,  काही दिवसांमध्ये काही प्रभावी व्यक्तींचे मला फोन येऊन गेले. ज्यामध्ये काही मुख्यमंत्री व उद्योगपतींचा समावेश आहे, त्यांच्याकडून वारंवार फोन येत आहेत. आम्हालाच लस लवकर हवी आहे, असं म्हणत त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे, असा खुलासा पुनावाला यांनी केला. ”याला धमक्या म्हणणं फार साधी गोष्ट ठरेल. या लोकांना असणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्याकडून वापरली जाणारी भाषा खरोखर खूपच विचित्र आहे. खरं तर हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. प्रत्येकाला आपल्याला लस मिळावी असं वाटतं आहे. मात्र आपल्याआधी इतरांना लस का दिली जातेय हे त्यांना समजत नसल्याचे अडचण निर्माण होतेय.” असं पुनावाला म्हणाले आहेत.

 

 

 

अदर पूनावाला हे सध्या कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये आहेत. तिथेच त्यांनी ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत या दबावाबद्दल माहिती दिली सीरम इन्स्टिट्यूट आता देशाबाहेर लस निर्मितीचा प्लॅन्ट सुरू करण्याचेही नियोजन करत असल्याचंही ते म्हणाले. सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसींना भारत सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, आत्तापर्यंत देशात झालेल्या लसीकरणामध्ये सर्वाधिक लसीकरण हे अदर पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीचं झालं आहे.

Protected Content