काहीही झाले तरी दिदीच जिंकणार ! : राऊत

मुंबई प्रतिनिधी । काहीही चर्चा होत असली तरी पश्‍चीम बंगालमध्ये ममतादिदी याच जिंकणार असल्याचा दावा आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते आज सकाळी पत्रकारांशी बोलत होते.

आज सकाळपासून पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. यात आसाममध्ये भाजप सत्ता कायम राखणार असल्याचे स्पष्ट झाले असून सर्वांचे लक्ष लागून असणार्‍या पश्‍चीम बंगालमध्ये मात्र चुरशीची लढत असली तरी तृणमुलने निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. हे चित्र स्पष्ट होताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना काहीही झाले तरी दिदीच जिंकणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, आज सकाळपासून पश्‍चीम बंगालमध्ये चुरस असल्याची चर्चा असली तरी येथे पुन्हा ममतांचीच सत्ता येणार आहे. देशात फक्त तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे सत्ताबदल होणार असून इतर ठिकाणी आहे तीच स्थिती कायम राहणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपला हवे तसे यश मिळाले असल्याबद्दल राऊत यांनी टीका केली. तर आम्हाला निकालांपेक्षा देशातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता असल्याचा टोला देखील त्यांनी मारला. दरम्यान, कोरोनाच्या प्रसारासाठी निवडणुकाच जबाबदार असल्याचा आरोपांचा त्यांनी पुनरूच्चार देखील केला.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.