राज्य मुख्याध्यापक महामंडळ संघाच्या राज्य प्रभारी अध्यक्षपदी जे.के.पाटील

यावल प्रतिनिधी । राज्य मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघा महामंडळच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्षपदी जे. के. पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

१ मे २०२१रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संघाच्या राज्य कार्यकारणीची सभा ऑनलाईन पार पडली , या सभेत सर्व सभासदांनी महामंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा मख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष जे.के. पाटील यांची महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जे. के. पाटील यांनी महामंडळासाठी केलेल्या आपल्या भरीव कामगीरी व योगदान पाहता त्यांची महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे. पाटील यांची राज्य कार्यकारणीवर निवडीमुळे जळगाव जिल्ह्यच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. या पदाला न्याय देणार असं व्याक्तीमत्व म्हणुन पाटील यांची संपुर्ण महाराष्ट्र राज्यात आहे . त्यांच्या निवडीबद्दल डॉ. सुरेश पाटील खानापुर यांच्यासह आदींनी त्यांचे स्वागत करून अभीनंदन केले आहे .

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.