भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावात राहणाऱ्या एका चार वर्षीय चिमुकलीचा वाहन पलटी झाल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २१ मे रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आरोशी विजय बशीरे वय ४ रा. निंभोरा ता. भुसावळ असे मयत चिमुकलीचे नाव आहे.
भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावात चार वर्षीय आरोशी ही चिमुकली आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. बुधवारी २१ मे रोजी सकाळी १० वाजता चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याने वाहन पटली झाले. यात अपघातात आरोशी या चिमुकलीचा दुदैवी मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे आक्रोश केला होता. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप बडगे हे करीत आहे.