चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीत पडल्याने एका ३५ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुदैवी घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र सुरेश शेवले वय ३५ रा. चोपडा असे मयत तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील पाटील वाडा परिसरात महेंद्र शेवले हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. २१ मे रोजी दुपारच्या सुमारास कामानिमित्त तो घराच्या वरच्या पाण्याच्या टाकीजवळ घेतला. त्यावेळी त्याचा तोल जावून तो पाण्यात पडला. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला बाहेर काढून तातडीने चोपडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र सोनवणे हे करीत आहे.