अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील सराफ गल्लीत राहणाऱ्या एका तरूणाचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून ७० हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घटना गुरूवारी २२ मे रोजी दुपारी १२ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील सराफ बाजारात रेहान सादिक बागवान वय १९ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २१ ते २२ मे रोजीच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. या फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून ७० हजार रूपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार गुरूवारी २२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहे.