अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली गावात राहणाऱ्या सात शेतकऱ्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी ४१ हजार रूपये किंतमीचे विद्यूत केबल वायर चोरी केल्याचा प्रकार २१ मे रोजी सकाळी ७ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी २२ मे रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील अंतूर्ली शिवारातील शेत परिसारात राहूल किशोर पाटील वय ३८ यांचे शेत आहे. २० मे रोजी सायंकाळी ५ ते २१ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातून ईलेक्ट्रीक केबल वायरची चोरी केली. तसेच याच परिसरातील लोटन दौलत पाटील, कैलास वसंत पाटील, भटू सुरेश पाटील, देवीदास एकनाथ पवार, दिपक माणिक पाटील, नवनीत जगन्नाथ पाटील यांच्या शेतातून देखील याच चोरट्यांनी केबल चोरी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान प्रकरणी राहूल पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.