धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील भावे गल्ली परिसरातून एका अज्ञात चोरट्याने छोटा मालवाहू ‘हत्ती’ वाहन चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात गुरुवार, २९ मे दुपारी चार वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विजय दिनकर महाजन (रा. बालाजी मंदिरजवळ, एरंडोल) यांच्या मालकीचे छोटा हत्ती वाहन क्रमांक (MH 43 BB 1499) हे धरणगाव शहरातील भावे गल्लीमध्ये पार्किंगला लावलेले होते. १५ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे ३ लाख ३५ हजार रुपये किमतीचे वाहन चोरून नेले.
घटनेनंतर विजय महाजन यांनी वाहनाचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर, त्यांनी गुरूवारी २९ मे रोजी दुपारी चार वाजता धरणगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करील सैय्यद हे करीत आहे.