Home Cities अमळनेर भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले ; तरूण जागीच ठार !

भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले ; तरूण जागीच ठार !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील डंगर बुद्रुक ते चोपडाई दरम्यान झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका ३८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. शिवाजी भगवान सैंदाणे (राहणार कोडावळ, ता. अमळनेर) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या संदर्भात माहिती अशी की, ८ मे रोजी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास शिवाजी सैंदाणे हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच १९ बीएफ बीएफ ०५८८) डंगर बुद्रुक येथून चोपडाईकडे जात होते. याच वेळी धुळे बाजूकडून येणाऱ्या एका भरधाव किआ सोनेट कारने (एमएच १९ ईजी ०५८८) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की शिवाजी सैंदाणे गंभीर जखमी झाले.

त्यांना तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मयताचे भाऊ शंभू भगवान सैंदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात कारवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ काशिनाथ पाटील पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound