भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील रेल्वेउड्डाण पुलाजवळ रस्त्यावर उभ्या ट्रकवर मालवाहू वाहन आदळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २९ मे रोजी पहाटे ४ वाजता घडली आहे. या संदर्भात सकाळी ११ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय सुधाकर खिल्लारे वय-२७ रा.किसान नगर जि.अकोला असे मयत तरूणाचे नाव आहे.
अक्षय खिल्लोर हा तरुण आपल्या आई पत्नी आणि नववर्षाच्या मुलासह वास्तव्याला होता. खाजगी वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी २९ मे रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अक्षय हा त्याचा चुलत भाऊ साहिल सुभाष खिल्लारे (वय-१८) याच्यासोबत वाहन क्रमांक (एमएच ३० बीडी ७८२९) ने अकोलाहून जळगाव येत होता. भुसावळ शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ ट्रक क्रमांक (आरजे १९ जीएफ ९७८६) हा ट्रक रस्त्यावर कुठलेही रिफ्लेक्शन न दाखवता उभा होता. त्यावेळी अक्षय यांची मालवाहू वाहन उभ्या ट्रॅक्टर धडकल्याने या भीषण अपघातात अक्षय खिल्लारे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला चुलत भाऊ साहिल खिल्लारे हा किरकोळ जखमी झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर ट्रक चालक हा वाहन घेऊन पसार झाला होता. या संदर्भात साहिल खिल्लारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शालिनी वलके करीत आहे.