शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये आठ उमेदवारांची नावे आहे. मुंबई दक्षिण मध्यमधून राहूल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, शिंडीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाणामधून प्रतापराव जाधव, हिंगोलीमधून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशिल माने यांची नावे या शिवसेनेच्या पाहिल्या यादीत आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये आठ पैकी सात विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या या पहिल्या यादीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची नावे नाही आहे. विशेष म्हणजे हेमंत गोडसे आणि श्रीकांत शिंदे हे आपल्या मतदारसंघातून १० वर्षापासून खासदार आहे. पण आता या दोन्ही नाशिक आणि कल्याण मतदारसंघावर शिंदे यांच्या शिवसेनेसोबत महायुतीत असणारा प्रमुख मित्रपक्ष भाजपने दावा केला आहे.

 

 

Protected Content