अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर- राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई प्रतिनिधी । भाजपने अजित पवार यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदासह त्यांच्या सहकार्‍यांना २० मंत्रीपद देण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर जोरदार शरसंधान केले. ते म्हणाले की, भाजपने राष्ट्रवादीच्या आमदारांना फितवण्याचे काम केले आहे. यात सध्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले असले तरी त्यांना पुढे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यात येणार असून त्यांच्या समर्थकांना २० मंत्रीपद देण्याची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

Protected Content