मटण खाण्याच्या वादावरून मजूराची हत्या; तीन जणांना अटक

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यवतमाळ जिल्हयातील हिंगणघाट येथे मजूर वीटभट्टीवर काम करताना मटन पार्टीच्या विषयावरून वाद झाल्याने सहकारी मजुराची तीन जणांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. तुकाराम नामद कासारे असे मृत मजूराचे नाव होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, हिंगणघाट येथील व्यंकटेश सदाशिव बोपचे यांचा वीटभट्टीचा व्यवसाय असून त्यावर यवतमाळ जिल्ह्यातील मजूर काम करतात. १३ मे रोजी आरोपी पांडुरंग बापूजी परसोडे, दिलीप अनंतराव दांडेकर, विजय दावलू मदनकर व मृतक तुकाराम नामदेव कासारे या चौघांना कामाचा मोबदला मिळाला असल्याने त्यांनी रात्रीला मटण पार्टी करण्याचे ठरवले.तुकारामने तिघांसोबत मटण पार्टीचा विषय काढला आणि त्यातून वाद निर्माण झाला. वाद विकोपाला जाऊन तिघांनी लाकडी दांड्याने तुकारामच्या डोक्यावर मारहाण केली. यात रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती शेजारील व्यक्तीने पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तीन जणांना अटक केली आहे.

Protected Content