अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरी चोरी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमरावतीच्या खासदार तथा भाजप उमेदवार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्या मुंबईत असलेल्या घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचे मुंबईतील खार परिसरात आहे. या घरातून दोन लाख रूपयांची रोख रक्कम चोरी केली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये राणा यांचे पीए संदीप ससे यांनी या प्लॅट मधील कपाटात दोन लाख रुपये ठेवले होते. आता या पैशांची आवश्यकता असल्याने संदीप ससे पैसे घेण्यासाठी तेथे गेले. मात्र त्यांना पैसे आढळले नाहीत.
निवासस्थानी घरगडी म्हणून काम करणारा अर्जुन मुखिया देखील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. या आधी देखील अर्जुनला वारंवार कॉल केल्यानंतरही तो कॉल उचलत नव्हता. म्हणून घरगडी असलेल्या अर्जुन मुखिया याने चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरात असलेल्या कपाटातील दोन लाख रुपये या प्रकरणी अर्जुन मुखिया याच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. अर्जुनचा शोध घेण्यासाठी एक टीम बिहार कडे रवाना होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

Protected Content