उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहत जीव वाचवले

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भीमा नदी पात्रात इंदापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. उजनी धरण पात्रात सायंकाळच्या सुमारास वादळी वारे सुटले होते. या वादळामुळेकळाशी ते कुगाव दरम्यान नदीत बोट बुडाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे ही बोट बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. बोट बुडाल्याने सहा जण बुडाले होते. त्यातील एकाने पोहत जाऊन आपला जीव वाचवला तर अन्य जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पलटलेली बोट पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशीहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातीलकुगावकडे जात होती. बोट पलटी झाल्याने यामध्ये ६ जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. यातील एकाने पोहत आपला जीव वाचवला.कुगावकडे जात असताना उजनी धरण पात्रात सायंकाळच्या वेळेत वादळी वाऱ्याचा फटका बोटीला बसला व त्यामुळे बोट पलटी झाली. या अपघातात बुडालेल्यांपैकी ५ जण बेपत्ता झाले आहेत.

घटना समजतात बचाव कार्यासाठी महसूल पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने बोट नदी पात्रात हेलकावे खाऊ लागली व यातील सहा जण बुडाले. या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण८ जण प्रवास करत होते. त्यामध्ये३ पुरुष,२ महिला,२ लहान मुली आदिंचा समावेश होता.मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने ही बोट पलटली. या वादळी वाऱ्यामुळे पाण्यात लाटा निर्माण झाल्या व त्यामुळे बोट उलटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटना समजतात बचाव कार्यासाठी महसूल पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ पोहचले आहेत.

उजनी धरणात याआधी देखील अशा दुर्घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी १० डॉक्टर आपल्या मित्रांसमवेत नौकानयनासाठी गेले होते. तेव्हा सेल्फी घेत असताना दुर्घटना घडली होती. त्यावेळी ४ डॉक्टरांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर आज पुन्हा उजनी धरणात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. उजनी धरणामध्ये आजोती (ता. इंदापूर) येथे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत ४ डॉक्‍टर बुडाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अकलूज,नातेपुते व माळशिरस परिसरातील १० डॉक्‍टर नौकानयनसाठी गेले असताना ही दुर्घटना घडली होती. ही घटना १ मे २०१७ रोजी घडली होती.

Protected Content