Home क्राईम कोरड्या विहिरीत पडून एकाचा मृत्यू

कोरड्या विहिरीत पडून एकाचा मृत्यू

0
36

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल शिवारातील अशोक नारायण चौधरी यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज दुपारी घडली.

याबाबत वृत्त असे की, सोमा वासुदेव भारुडे (वय ५३ वर्ष ) हे अट्रावल शिवारातील अशोक नारायण चौधरी यांचे शेतातील कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावल तालुक्यातील अट्रावल शिवारातील ही घटना आज दिनांक ९ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची खबर काशिनाथ वासुदेव भारुडे यांनी येथील पोलिस ठाण्यात दिल्यावरुन येथील पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस हवालदार अजिज शेख हे करीत आहेत. मयत सोमा भारूडे यांच्या पार्थिवाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी बी. बी. बारेला यांनी शवविच्छेदन केले.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound