बोरावल शिवारात गावठी दारू नेणार्‍यांवर कारवाई

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोरावल शिवारात पोलीसांच्या गस्ती पथकाने हातभट्टीची दारू वाहतुक करणार्‍या दोघांना पकडले असून एक जण मात्र फरार झाला आहे.

या बाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली माहीती अशी की यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे हे आपल्या सहपोलीस कर्मचार्‍यासोबत गस्तीवर जात असतांना तालुक्यातील बोरावल गावाजवळ दोन मोटरसायकल थांबवुन एक मोठी गोणी एकमेकाकंडे अदलाबदल करीत असल्याचे पाहुन पोलीस पथकाने त्यांना हटकले. यामुळे घटनास्थाळावरून पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलीसानी त्यांचा पाठलाग करून एक बजाज डिसकव्हर मोटरसायकल क्रमांक एमएच १९ एजे३७१८यावरील स्वार सचिन कडु सोनवणे वय२३ वर्ष आणी हितेंद्र कौतीक बााविकर वय३३ वर्ष (दोघे राहणार पाडळसा ता. यावल) यांना पकडले असता त्यांच्या ताब्यातील गोणीची झाडाझडती केली असता त्या गोणीतुन एक प्लास्टीक कॅन मिळुन आली असुन त्यात गावटी हातभट्टीची३ ५ लिटर दारूमिळुन आली असता त्या दोघांना पकडण्यात यश आले असता मात्र त्यांना गावटी दारु पुरविणारा भोलाणे जळगाव येथील राहणारा सुधाकर सपकाळे हा त्याच्या ताब्यातील हीरो होंडा मोटरसायकलने पळुन गेला असुन या संदर्भात यावल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content