पाच शहरांमधील मद्याची दुकाने बंद; जिल्ह्यात इतरत्र मात्र परवानगी

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी जळगावसह भुसावळ, अमळनेर, चोपडा आणि पाचोरा नागरी हद्दीतील मद्य विक्री करणार्‍या दुकानांवर १७ मे पर्यंत बंदी घातली असून जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये मात्र सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सायंकाळी एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून येत्या सात दिवसांमध्ये कोरोना बाधीत असणार्‍या तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि सेवा बंद राहणार आहेत. यानंतर त्यांनी मद्याबाबतही एका पत्रकान्वये निर्देश दिलेले आहेत. यानुसार, जळगाव महापालिका, भुसावळ नगरपालिका, अमळनेर नगरपालिका, चोपडा नगरपालिका, पाचोरा नगरपालिका व अडावद ता. चोपडा ग्रामपंचायत हद्दीतील मद्याची सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

दरम्यान, वर दिलेला नागरी भाग वगळता अन्य ग्रामीण भाग तसेच अन्य तालुक्यांमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये वाईन शॉप्स, बियर शॉप्स तसेच देशी दारूच्या दुकानांचा समावेश आहे. तर कंटेन्मेंट झोन वगळता दारूची होलसेल दुकाने देखील सुरू राहणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content