दोषी आढळल्यास ‘त्या’ सीएंवर होणार कारवाई

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या धरम सांखला आणि महावीर जैन या दोन्ही सीएंवरील दोष सिध्द झाल्यास त्यांच्यावर आरसीएआय संस्था कारवाई करणार असल्याचे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

इंडियन चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इन्स्टिट्यूटचे पश्‍चिम विभागाचे (डब्ल्यूआयआरसी) चेअरमन सीए ललित बजाज यांनी पत्रकार परिषदेत बीएचआर प्रकरणातील सीएंच्या सहभागावर संघटनेची भूमिका स्पष्ट केली. बीएचआर घोटाळ्यात धरम सांखला आणि महावीर जैन या दोन सीएंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्या दोन सीएंवर आरोप झाले आहेत, त्यांची देखील चौकशी करेल. त्यांना न्यायालयाने अद्याप दोषी ठरवले नसल्याने त्यांची बाजू मांडायची बाकी आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यास आयसीएआयतर्फे त्यांच्यावर काम थांबवण्याची कारवाई करण्यात येईल असे ललीत बजाज यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला आयसीएआयचे पश्‍चिम विभागाचे उपाध्यक्ष सीए विशाल दोषी, सचिव मुर्तझा काचवाला, उमेश शर्मा, जयेश काला, जळगाव सीए असोसिएशनचे चेअरमन सागर पटनी, कोषाध्यक्ष सौरभ लोढा, स्मिता बाफना, श्रेय कोठारी आदी उपस्थित होते.

Protected Content