राष्ट्रीय हिंदू आंदोलन संघटनेचे निदर्शने ! (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तेलंगाणा राज्यातील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना सुरक्षा प्रदान करावी, झारखंड येथील मुलीच्या मारेकल्याला शिक्षा द्यावी आणि गणेश भक्तांवर लाठीमार करणाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन संघटनेच्या वतीने गुरूवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेलंगाणा राज्यातील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आमदार टी. राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्रास दिला जात आहे. त्यांना अटक करण्यापूर्वी आणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृत्ती लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे आमदार राजासिंह याना त्वरित सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी. तसेच झारखंड येथील एका मुलीच्या मारेकरी शाहरूखला फाशीची शिक्षा करावी आणि जळगाव तालुक्यातील धानोरा येथे गणेश विसर्जनाच्या वेळी विनाकारण गणेश मंडळातील सदस्यांवर आणि निष्पाप गणेश भक्तांवर लाठीमार करून त्यांना अमानुष मारहाण करणार्‍या सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांना त्वरित निलंबित करावे आणि गणेश भक्तांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना जिल्हा प्रमुख प्रशांत जुवेकर यांनी दिले आहे. याप्रसंगी प्रशांत जुवेकर, मोहन तिवारी, आनंद मराठे, आकाश चव्हाण, आशिष गांगवे, भिका मराठे, अजय पाटील, भूषण महाजन, प्रणव नागने, निखिल कदम आदी उपस्थित होते.

 

Protected Content