पिंपरी-चिंचवड शहरात गोळीबार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पिंपरी- चिंचवड शहरात झालेल्या गोळीबाराची खळबळ घटना घडली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी या प्रकरणात हर्षल सोनवणेला अटक केली आहे. गोळीबार केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे फरार झाला होता. पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलसह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावरही गुन्हा नोंद केला आहे. या गोळीबारात अजय सुनील फुले हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या अजयचा गॅस शेगडीचा व्यवसाय आहे. गोळीबार केलेला आरोपी हर्षलचा सुद्धा तोच व्यवसाय आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरु होता. त्यामुळे हर्षलने अजयला मारण्यासाठी कट रचला. शाम आणि लिलारे अजयच्या दुकानात येऊन वाद मिटवण्यासाठी गेले होते. चर्चा सुरु असतानाच हर्षल सुद्धा त्याठिकाणी आला. यावेळी हर्षलने पिस्टल काढत तीन गोळ्या अजयवर झाडल्या. एक गोळी अजयच्या दंडाला लागली. दुसरी गोळी किर्तीकुमार लिलारेच्या मानेला लागली.

Protected Content