जळगाव प्रतिनिधी । शहरातील हिराशिवा कॉलनीत राहणारी १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील हिरा शिवा कॉलनी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही यावल तालुक्यातील बामनोद येथे मावशीकडे राहते. वडील मोलमजूरी करून उदरनिर्वाह करतात. मुलगी मावशीकडे राहत असतांना २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बँकेतून पैसे काढून येते असे सांगून मावशीला सांगून केली होता. परंतू सायंकाळपर्यंत ती घरी न आल्याने तिचा आईवडीलांकडे व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. अल्पवयीन मुलगी मिळून न आल्याने तिच्या वडीलांनी जळगाव तालुका पोलीस ठाणे गाठले. अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतिष हारनोळ करीत आहे.