टाळेबंदीच्या काळात ‘अंत्योदय’ जनसेवा कार्यालय ठरले व्यावसायिकांचे कैवारी

 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । तालुक्यातील छोटे-मोठे व्यावसायिकांचे टाळेबंदीच्या काळात व्यावसाय ठप्प झाले  मात्र आ. मंगेश चव्हाण यांचे अंत्योदय जनसेवा कार्यालय हे त्यांच्यासाठी आधारस्तंभ ठरले  आ. चव्हाण यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत ५३ लाभार्थ्यांच्या खात्यात ५ लाख ३० हजार कर्ज जमा झाले आहे. या ५३ लाभार्थ्यांनी पुन्हा व्यावसायाला सुरूवात केली आहे.

 

कोरोनाच्या काळात अनेक छोटे- मोठे व्यावसायिकांचे व्यावसाय बंद पडले होते. अशावेळी आ. मंगेश चव्हाण यांच्या  कार्यालयात जाऊन तालुक्यातील ५३ व्यावसायिकांनी  पंतप्रधान स्वनिधी योजनेचा फार्म भरला. आ. मंगेश चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या ५३ लाभार्थ्यांच्या खात्यात ५ लाख ३० हजार कर्ज भांडवल जमा झाले आहे. त्यामुळे अनेकांनी व्यवसायाला सुरुवात केली आहे.

 

आतापर्यंत या कार्यालयामार्फत शहरातील १८३ अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले त्यातील लाभार्थी सुखदेव जाधव (सेवानिवृत्त मिल कामगार, शिवशक्ती नगर, चाळीसगाव ) हा दहा वर्षांपासून खारी पाव व टोस्ट  विक्री करून उदरनिर्वाह चालवत होता.मिल बंद पडल्याने खारी पाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत व्यावसाय बंद पडल्याने जगणेच असह्य होऊन गेले .

 

दरम्यान आ. मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयामार्फत पंतप्रधान स्वनिधी योजनेतून १० हजार रुपयांचे कर्ज मिळत असल्याची माहिती मिळाली. सुखदेव जाधव यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केला.लाभ मंजूर होऊनही बॅंकेत फेरफटका मारावा लागत होता. सुखदेव जाधव यांनी आमदारांच्या  निदर्शनास आणून दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी १० हजार रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. सुखदेव जाधव यांनी पुन्हा हातगाडीवर पाव विक्रीला सुरूवात केली आहे. आमदारांचे  त्यांनी आभार मानले आहेत.

 

. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोकेवर काढले असल्याने कडकडीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कठीण काळात पंतप्रधान स्वनिधी योजनेतून कर्ज स्वरुपात मिळालेल्या १० हजार रुपयांच्या भांडवलाची मोठी मदत झाल्याची भावना अनेक पथविक्रेते यांनी व्यक्त केली.

Protected Content