निवडणूकीचे काम न करणाऱ्या शिक्षक बीएलओविरोधात गुन्हा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निवडणूक आयोगाने दिलेल्या जवाबदारीचे पालन न करता कामात कुचराई केल्याप्रकरणी भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे शिक्षक तथा बीएलओ अजय चिंधू डोळे यांच्याविरोधात गुरूवारी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ शहर पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अजय डोळे यांच्यावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यादी क्रमांक १३६ म्हणून जवाबदारी सोपवण्यात आली होती मात्र डोळे यांनी दिलेल्या जवाबदारीकडे दुर्लक्ष केले तर यादी भागातील १८५ मतदारांचे स्पष्ट फोटो गोळा करणे ८० पेक्षा जास्त वय असणार्‍या ४४  मतदारांची पडताळणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या मात्र डोळे यांनी केवळ ३१.५८ टक्के काम पूर्ण केले.

 

निवडणूक आयोगाने सोपलेल्या कामांकडे डोळे यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली तसेच ते बैठकीसही अनुपस्थित राहत असल्याने गुरुवारी निवडणूक नायब तहसीलदार अंगद भागवत आसटकर यांनी प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाने त्यांच्याविरोधात लोकप्रतिनिधीत्व  १९५० चे कलम ३२ व भारतीय दंडसंहिताचे कलम १८८ अन्वये भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content