विद्यापीठात ‘पेटंट’ विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बौध्दिक संपदा अधिकार कक्ष, रसायनशास्त्र प्रशाळा व वुई गो लायब्ररी फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार ९ सप्टेंबर रोजी “पेटंट” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या कार्यशाळेत कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रशाळा संचालक डी. एच. मोरे व वुई गो लायब्ररी फाउंडेशनचे निलेश पावसकर यांच्या उपस्थितीत सामजंस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत.

कार्यशाळेच्या व्याख्यान सत्रात “बिल्डींग पेटंट” या विषयावर स्मिता माने, “इकोसिस्टीम इन इंडीया” या विषयावर निलेश पावसकर व डॉ. निखिल पाठक तसेच “पेटंट फाईलिंग कसे करावे” या विषयावर पराग खेडकर, मोहिनी सुर्यवंशी हे बोलणार आहेत. कोणते पेटंट क्लेम करावे व करू नये या विषयावर रावसाहेब घेगाडे, तसेच पेटंटव्दारे कशी कमाई होऊ शकते या विषयावर आनंद जाधव, श्रीकांत जोशी, निनाद कुलकर्णी हे व्याख्यान देतील. बौध्दिक संपदा अधिकार या विषयावर प्रसाद वाघ, मोहिनी सुर्यवंशी मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेमुळे संशोधकांना त्यांनी केलेल्या संशोधना संदर्भात पेटंट दाखल करतांना संपूर्ण कार्यवाहीचे मार्गदर्शन प्राप्त होईल. या कार्यशाळेत विद्यार्थी, शिक्षक, संशोधकांनी सहभाग घ्यावा असे कार्यशाळेचे समन्वयक डॉ. विकास गिते यांनी कळविले आहे.

Protected Content