विचार वारसा फाऊंडेशन गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।शहरातील रामेश्वर कॉलनीतील विचार वारसा फाऊंडेशन गणेश मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी आशिष राजपूत तर उपाध्यक्षपदी अभिषेक राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात असलेल्या विचार वारसा फाऊंडेशन गणेश मंडळाची नुकतीच बैठक घेण्यात आली. या मंडळाचे हे तिसरे वर्ष आहे. सदरील बैठकीत या वर्षीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचे ठरले असून नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर  करण्यात आली.

अध्यक्षपदी आशिष राजपूत, उपाध्यक्ष अभिषेक राजपूत, गौरव डांगे, संकेत म्हस्कर, सचिव-मयूर डांगे, सदस्य यश जाधव, मंगेश मांडोळे, उमेश पाटील, आकाश राजपूत, लोकेश निकम, यांची निवड संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी केली. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ तसेच तरुण सदस्य यांची उपस्थिती होती.

Protected Content