खडसेंनी रिपाइंत यावे…आपण दोन्ही मिळून सरकार आणू ! -आठवलेंची धम्माल ऑफर

रामदास आठवलेंची नाथाभाऊंना धम्माल ऑफर

मुंबई । ”एकनाथराव खडसे आधीच राष्ट्रवादीत गेले असते तर मंत्री झाले असते…आता तिकडे सर्व फुल झाले असल्याने त्यांनी रिपाइंत यावे…आपण दोन्ही मिळून सरकार आणू !” अशी धम्माल ऑफर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज दिली आहे.

आज सकाळपासूनच भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे चर्वण सुरू आहे. यात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेत केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की, ”एकनाथ खडसेंनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं होतं. ते आधीच राष्ट्रवादीत गेले असते तर मंत्री झाले असते. आता तिकडे सारे काही फुल आहे. आता खडसेंनी रिपाईंमध्ये यावं, आपण दोघे मिळून आपलं सरकार आणू,” असे आठवले म्हणाले. अर्थात, रामदास आठवले यांची ही धम्माल ऑफर चर्चेचा विषय बनली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.