आदीवासी तडवी भिल समाजातील जेष्ठ कार्यकर्ते फकीरा तडवी कालवश

यावल ( प्रतिनिधी ) येथील शहरातील तडवी कॉलनीतील रहिवासी फकिरा दिलदार तडवी – पाटील (वय ९५, मुळ रहिवासी कळमोदा ता. रावेर) यांचे बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. 

त्यांची अंतयात्रा गुरूवारी कळमोदा ता. रावेर येथुन सकाळी ९ वाजेला जुन्या घरा पासुन निघणार आहे. त्यांच्या पश्चात १० मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे ते सेवा निवृत्त कृषी अधिक्षक साबीर तडवी, आदिवासी विभागातील कर्मचारी अमानउल्ला तडवी, तहसिल कार्यालयातील नायब तहसिदार मुक्तार तडवी यांचे वडील; तर यावल पुरवठा विभागातील सकावत तडवी यांचे आजोबा होत. 

भिल संस्कृतीत सामाजिक विरोध स्वीकारुन रात्री होणारा चेहलुम (उत्तर कार्य) दिवसा करण्याची परंपरा रुढ करणारे, चार दिवसाचा लग्नसोहळा तीन दिवसात उरकण्याची प्रथा रुढ करणारे या आणि अशा सामाजिक बुरसटलेल्या रुढी परंपरांचा त्याग करुन समाजात परीवर्तनाची चळवळ घडवणारे फकीरा पाटील (तडवी) यांच्या जाण्याने तडवी भिल समाजात एकप्रकारे पोकळी निर्माण झाली आहे. 

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील स्वातंत्र्य काळातील स्वातंत्र्य  सेनानी धनाजी नाना चौधरी घराण्याच्या तीन पिढ्यांचे सहकारी (धनाजी नाना, बाळासाहेब चौधरी व आमदार शिरीष चौधरी) यांचे एक विश्वासु सदस्य फकीरा पाटील यांची ओळख होती. जानोरी ता. रावेर येथे पोलिस पाटीलच्या सेवेत असतांनाच धनाजी नानांची त्यांची ओळख झाली. त्यानंतर स्वर्गीय मधुकरराव चौधरी (बाळासाहेब चौधरी) व नंतर आमदार शिरीष चौधरी यांच्या बरोबर ते खांद्याला खांदा लाउन सहकार्य केले. 

फकीरा पाटील मुळचे जानोरी या गावाचे वाधे जामलकर कुलवंशीय होते. त्यांच्या कुळाची आंजने म्हणुनही ओळख आहे. १९५० ते १९५८ या आठ वर्षे ते जानोरी गावचे पोलिस पाटील म्हणुन कार्यरत होते. त्यांचा परीवार समाजातील मोठ्या परीवारांपैकीच एक मोठा परीवार आहे.

Protected Content