भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | समाजातील जेष्ठ नागरिक हे अनुभवाचे कल्पवृक्ष आहेत. मला जेंव्हा जेंव्हा अडीअडचणी येतात, तेव्हा मी आवर्जून जेष्ठ नागरिकांचा सल्ला घेतो आणि मला मानसिक समाधान लाभते, असे प्रतिपादन आज माजी पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज केले.
ऊँ सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव जेष्ट नागरीक संघांचे वार्षिक सर्वसाधारण सभा आज आनंदा भोळे नगर याठिकाणी होती. यावेळी व्यासपीठावर डॉ.संकेत तळेले, सतीश सपकाळे, मुकेश पाटील, विशाल जगले, दीपक धांडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, वासुदेव जेष्ठ नागरिक संघाने जागा दाखवावी मी आमदार निधीतून त्याठिकाणी प्रशस्त सभागृह बांधून देण्याचा मी आपल्याला शब्द देतो. यावेळी संघातील 80 वर्ष पूर्ण झालेले नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सर्व जेष्ठ नागरिकांना आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते तिरंगा वाटण्यात आला व हा महोत्सव सर्वांनी साजरा करण्याच आवाहन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष धनराज पाटील, सचिव प्रभाकर झांबरे, उपाध्यक्ष विश्वनाथ वाणी, संयोजक डॉ. नितु पाटील, रूपा पाटील, लोटन फिरके, यामासा भावसार,रमण भोंगे, सदशीव शिंपी, वैशाली पाटील, ज्योती चौधरी, लता चौधरी, ललिता टोके,विजया भारंबे, लता जगले,अशोक धाके, दिलीप जंगले प्रमोद बोरोले, हेमंत बॉंडे, रत्नप्रभा बोरोले, रजनी राणे, एस. बेलसरे, भानुदास पाटील, प्रकाश चौधरी, आदी प्रभागातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहभोजनाचा कार्यक्रमावेळी स्वतः हा आमदार यांनी सर्व जेष्ठ नागरिकांना जेवण वाढल्याने सर्वांना सुखद धक्का बसला. यावेळी सूत्रसंचालन प्रा. पी. जी.पाटील यांनी केले.