फार्मसी महाविद्यालयात “ग्रंथपाल” दिन उत्साहात

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तापी परिसर विद्यामंडळ संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी, “औषध निर्माण शास्त्र” महाविद्यालयात पद्मश्री डॉ.एस.आर.रंगनाथन यांची जयंती (ग्रंथपाल दिन) उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही आर पाटील सरांनी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरांनी जीवनात ‘ग्रंथांचे आणि वाचनाचे महत्त्व’ पटवून दिले. प्रास्ताविक ग्रंथपाल, मंगला मोरे यांनी केले तर ग्रंथपाल दिन का साजरा केला जातो याचे महत्त्व पटवून देण्यात आले. डॉ.एस.आर.रंगनाथन यांचे जीवन चरित्र तसेच कार्यक्रमाचा उद्देश सांगण्यात आला.

सदर कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.आर.वाय.चौधरी, डॉ.एल.एस.पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाय.टी.वाघुळादे आशिष भारंबे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content