यावलचे आर. के. पवार ठरले उत्कृष्ट नायब तहसीलदार

WhatsApp Image 2019 08 02 at 9.40.40 AM

यावल प्रतिनिधी | येथील नायब तहसीलदार आर.के. पवार यांचा फैजपुर विभागातुन उत्कृष्ट  नायब तहसीलदार म्हणुन सन्मान करण्यात आला.  मागील सहा महीन्यांच्या कालावधीत निवासी नायब तहसीलदार पवार यांनी शेतकरी व जनसामान्यांच्या कामांना अधिक प्राधान्य देवुन प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणीक लागणाऱ्या विविध दाखले लवकरात लवकर देण्यास प्राधान्य दिले त्यांच्या या व इतर कामगिरी लक्षात घेऊन रावेर येथे १ ऑगस्ट रोजी महसुल दिनी उत्कृष्ठ नायब तहसीलदार म्हणून गौरविण्यात आले.

हा सन्मान प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर , रावेर तहसीलदार उषारानी देवगुणे, रावेर व यावल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी तसेच महसुल कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.  या सोबत आर. के. पवार यांनी तालुक्यात अनधिकृत वाळु तस्करीस पायबंद घालण्यासाठी प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले व तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली. अशा अनेक कामांमधून आपली कार्यतत्परता दाखविल्याने पवार यांना गौरविण्यात आले. तर यावल तहसील कार्यालयात पवार यांचा संगायोचे अध्यक्ष विलास चौधरी, भाजपाचे पदाधिकारी उज्जैनसिंग राजपुत, पत्रकार राजु कवडीवाले, शेखर पटेल, पराग सराफ, अरूण पाटील, ज्ञानदेव मराठे, तेजस यावलकर, अय्युब पटेल, सुनिल गावडे यांनी व तहसील चे कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

Protected Content