राज्यात हायवे मृत्यूंजय योजना राबवली जाणार

मुंबई : वृत्तसंस्था । राज्य वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण राज्यात हायवे मृत्यूंजय योजना राबवली जाणार आहे. तशी घोषणा राज्य वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे

राज्यातील विविध महामार्गांवर वाहनचालक शिस्त पाळत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात होतात. अनेकांचा जीव जातो. मात्र आता महामार्गांवर होणाऱ्या अपघातातील जखमींचा जीव वाचवण्यासाठी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे..

महामार्गांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना तात्काळ मदत मिळावी यासाठी महामार्ग परिसरातील ठराविक स्थानिकांना मृत्यूंजय देवदूत हे नाव देण्यात येणार आहे. ज्या स्थानिकांना मृत्युंजय देवदूत हे नाव दिले जाईल ते सरकारी व्यवस्थेशी जोडले जातील आणि अपघातग्रस्तांना मदत मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका असेल. त्यांना अपघातग्रस्तांच्या तात्काळ मदतीसाठी लागणारे स्ट्रेचर, फर्स्ट एड बॉक्स आणि इतर साहित्यही दिले जाणार.आहे

आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती मृत्युंजय देवदूत अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणार.आहेत महामार्ग सुरक्षा पथकाकडून मृत्युंजय देवदूतांना ओळळपत्रही देण्यात येणार. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्यांचा देवदूतांचा राज्य सरकारच्या रस्ते सुरक्षा विभागाकडून सन्मानही केला जाणार आहे

२०२० सालात महाराष्ट्रात विविध ठिकाणी रस्ते अपघातात तब्बल ११ हजार ४५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती रस्ते वाहतूकमंत्री अनिल परब यांनी दिली कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघातांची संख्या कमी झाली होती.

Protected Content